देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते अत्यंत महत्त्वपूर्ण शॉर्ट टर्म कोर्सेस अल्पकालीन अभ्यासक्रम या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई येथे झाले, याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व आय टी आय मध्ये देखील शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू झालेले असून याचे देखील उद्घाटन प्रत्येक आय टी आय मध्ये झाले. नागपुरातील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रममाचा शुभारंभ झाला.