राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील दळण-वळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेला राहुरी-मांजरी रस्ता हा अत्यंत नादुरुस्त झाला आहे. रस्त्यामध्ये मोठ-मोठी खड्डे पडल्यामुळे त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वळण ग्रामस्थांनी आज शनिवारी सकाळी रस्त्यामधील साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण करत गांधीगिरी केली आहे.