हिंगोली, दि.07 राजे उमाजी नाईक यांची जयंती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.