पोलीस शिपाई लक्ष्मीचंद आदमने हे आपल्या गणवेशात गौतमनगर येथील प्रशांत कहालकर याला केस क्रमांक 2030/2024 मध्ये निघालेल्या जामीन वॉरंटची तामिल करण्यासाठी गेले. मात्र आरोपींने वारंट पाहून किसका वॉरंट है, कैसा वारंट है, किसने भेजा. असे म्हणत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत थापडबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जवळ असलेल्या विटाचा तुकडा उचलून हल्ला करण्यासाठी धावला व आदमने यांच्याकडे इतर समंन्स व वारंट फाडून टाकत घटनास्थळावरून पळून गेला.