ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची ६८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना चिखलीतील मोरेवस्ती येथील भावेश्वरी कॉलनी येथे घडली. याप्रकरणी वैष्णील अनिल तायडे (रा. चिखली, पुणे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.