हिंगणघाट शहरातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मेवात हॉटेल जवळ पोलीस गोवंश तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाई करीत ११ बैलासह ट्रक असा एकुण १७ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाला आहे.प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पथकाला नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पथकाने याठिकाणी रवाना होऊन मेवात हॉटेल जवळ सापळा रचून कारवाई केली.