सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून माढा तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून तब्बल 65,500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सिना नदीच्या दोन्ही काठांवरील अनेक शेतकरी व नागरिक अडकून पडले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिधोरे गावातील 36 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.