नांदुरा शहरात मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह मंजूर करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष शैलेश वाकोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आज 7 सप्टेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे शेगाव येथे आले होते. ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलींची शिक्षणात होणारे पीछेहाट हा चिंतेचा विषय बनला आहे.