गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज सहा सप्टेंबर रोजी पूर्णा नदी पात्राजवळ पोलीस प्रशासनासह जीवन रक्षक टीमचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. नांदुरा जळगाव जामोद मार्गावरील येरळी नजीकच्या पुलावर मोठ्या प्रमाणात गणेश मंडळ गणपती विसर्जनासाठी येत आहेत यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांसह ओम साई फाउंडेशनच्या जीवन रक्षक टीमचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आता सायंकाळी पाच वाजता पासून नांदुरा शहरातील मोठ्या मंडळाचे मिरवणूक सुरू होणार आहे.