धाराशिव तालुक्यातील कोल्हेगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खुन केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय 35) हे पत्नी साक्षी टेकाळे (वय 28) हिच्यासोबत कोल्हेगाव येथे राहत होते. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने आत्महत्या केली आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन च्या सुमारास घडली आहे.