यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात पावसाने जोरदार तडाका दिला असून यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नद्या नाले दुथडी भरून वाहत आहे. यवतमाळ जिल्ह्यात 24 तासांमध्ये 27.5 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून तब्बल 22 महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.काल दिनांक 28 ऑगस्ट व आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.