उमरेड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील शेंद्रे क्लिनिकसमोर पिकप वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये आठ गोवंश जनावर आढळून आले. याप्रकरणी आरोपी चालक विजय राठोड व त्याचा साथीदार अशोक तांदूळकर विरोधात उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून पिकप वाहन व गोवंश जनावरे असा एकूण 4 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.