वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या राजाच्या आगमन सोहळ्यात आज रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार हे सहभागी झालो. यावर्षी या मंडळाचे 30 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वाजत गाजत आणि उत्साहात बाप्पाचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.