राहुरी शहरातील जंगम गल्ली येथील वैजनाथ मित्रमंडळाच्या वतीने आज शूक्रवारी श्रावण मास निमित्ताने वैजनाथ मंदिरात एक भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ५१ कुंडात्मक शिवशक्ती याग, सामुदायिक पार्थिव शिवलिंग पूजन व वैजनाथ महाराजांचा अन्नकोट सोहळा आयोजित करण्यात आला होता.