नगर भूमापनच्या मालकी हक्काशी संबंधित महसुली अपील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही लोक अदालत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली येथे पार पडणार आहे.