गंगापूरीत दुचाकी चोरी सीसीटीव्हीत कैद, व्हिडीओ व्हायरल गंगापूरी येथे काळ्या रंगाची मोपेड दुचाकी चोरत असल्याचा व्हिडीओ सोमवारी दुपारी २ वाजता व्हायरल झाला आहे. त्याबाबत काँग्रेसचे नेते जयदीप शिंदे यांनी संबंधित गाडी कोणाची चोरीला गेली आहे का, व्हिडीओमध्ये एकजण गाडी नेताना दिसत आहे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, वाई शहरातील चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होवू लागली आहे. |