धुळे शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून अंदाजे ३०० हून अधिक सार्वजनिक मंडळे व ६० हजारांहून अधिक घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना झाली आहे. २४ गावांत ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबवली जाते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात आहेत. पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांचे आगमन होऊन भक्तिमय वातावरण निर्माण झाले.