नालासोपारा येथे एका इमारतीत असलेल्या टपाल कार्यालयाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. टपाल कार्यालय बंद असताना कार्यालयाला अचानक आग लागली. अग्निशमनदलाने घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले. आग छोटी असल्याने व कार्यालय बंद असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र टपाल कार्यालयाला लागलेल्या आगीत अनेक कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.