आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज यवतमाळमध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये जोरदार कामगिरी करून यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी महत्त्वाच्या योजनांवर चर्चा झाली.