25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात साजरा होणाऱ्या नेत्रदान पंधरवड्या निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटच्या संयुक्त विद्यमानाने एक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विशेष उपक्रमात पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन आणि नेत्रदान मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित केले.