सण-उत्सवांच्या काळात शांतता राखण्यासाठी, गडचिरोली पोलिसांनी ७७ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे.गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. ज्या गुन्हेगारांवर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांच्यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता आहे, अशा ७७ गुन्हेगारांना बी.एन.एस.एस. कलम १६३ (२) अंतर्गत हद्दपार करण्यात आले आहे.