शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी तालुक्यातील ग्राम उमरी येथील धोंडू मनीराम पटले (६६) या वृद्धाने सोमवारी (दि. ८) विषप्राशन केले. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.