आज दि 2 सप्टेंबर दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या कांचनवाडी भागात एका सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या 2 चोरट्यांनी अवघ्या 11 मिनिटात 2 फ्लॅटचे कुलूप तोडून जवळपास पावणेदोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना घडले आहे. या प्रकरणातील फिर्यादी प्रवीण अरविंद कोकाटे हे शिक्षक आहेत. महालक्ष्मी निमित्त ते आपल्या गावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडले आणि त्या घराशेजारीच राहणाऱ्या पुष्पा निंबाळकर यांचे देखील घर त्याच्यावर त्यांनी फोडून सोन्याचे दागिने लंपास केले आहे.