धुळ्यासह जळगाव शहरातून दुचाकी चोरणाऱ्या इरफान खॉ उस्मान खॉ पठाण (वय २१, मूळ रा. साक्री, ता. धुळे, ह. मु. गेंदालाल मिल) व त्याचा मित्र आदिल शेख उर्फ नाट्या माजीद शेख (वय १९, रा. गेंदालाल मिल) यांच्या शहर पोलिसांनी शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता गेंदालाल मिल परिसरातून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.