विट्यातील करंज ओढ्या जवळ इनोव्हा कारवरील ताबा सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की साळशीणगे येथील इंद्रजित विजय गोतपागर आणि सुशांत महेंद्र कांबळे हे दोघे रविवारी काही कामानिमित्त साळशीणगे येथून विट्यात येत होते करंज ओढ्याजवळ असणाऱ्या वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी इनोव्हा कार ने अनेक पलटी खाल्या त्यात इंद्रजित गोतपागर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर सुशांत कांबळे हा तरुण गंभीररीत्या