धुळे शहरातील दक्षता पोलीस वसाहतीत कार तोडफोडीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रविवार, २४ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास दोन तरुणांनी हातात दांडके घेऊन एका घरासमोर उभ्या कारच्या काचा फोडल्या. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पोलीस वसाहतीत घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली असून, पोलीस संशयितांचा शोध घेत तपास सुरू आहे.