सावधान! कनोली गावात रस्त्यावर बिबट्याचा धुमाकूळ सात-आठ ग्रामस्थ जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण संगमनेर तालुक्यातील कनोली गावात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालत नागरिकांचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेजर दत्तात्रय बाबासाहेब वरपे यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर हा बिबट्या अचानक समोर आला आणि गावकऱ्यांवर हल्ला चढवला. इतकेच नव्हे तर मोटारसायकलवरून जाणाऱ्या ग्रामस्थांचाही त्याने पाठलाग करून शिकार करण्याचा प्रयत्न केला.