तालुक्यातील शिंदेवडगाव येथे शुक्रवारी (ता.५) मध्यरात्री घरफोडी करून चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज लांबविला. शिंदेवडगाव येथील राजाराम सीताराम जाधव (वय ५२) यांची चुलतीची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना भेटण्याकरिता नातेवाईक हे घरी आले होते. शुक्रवारी सर्वानी जेवण करून चॅनल गेटला कुलूप लावून झोपी गेलो होते. दरम्यान, मध्यरात्री राजाराम जाधव यांच्या पत्नीला चोरटे घरातील साहित्य घेऊन जाताना दिसले. आरडाओरड केल्याने घरातील सदस्य उठल्याने चोरटे दुचाकी व मोबाइल सोडून पसार झाले.