चासनळीत पतीने पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याचे निदर्शनास आले. त्या दृष्टीने तालुका पोलिसांनी तपास सुरू केला असता तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला संपवले त्यानंतर स्वतः गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. मृत्यूपूर्वी मयत अंगणवाडी सेविका स्वाती दिलीप मीजगुळे यांचे पती दिलीप शंकर मिजगुळे यांनी भिंतीवर शेजारच्या तिघांची नावे लिहून ठेवली होती. त्यांच्यावर तालुका मयताच्या मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.