शाळकरी मुलांमध्ये भांडण झाले. या भांडणात दोघांनी एका मुलावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना तळेगाव चाकण रोडवर घडली. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक अल्पवयीन मुलगा आणि एका अल्पवयीन मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.