बीडजवळील इमामपूर रोड परिसरात तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वी तिचे वडील जयराम बोराडे यांचा मृतदेह याच परिसरात सापडला होता. वडिलांसोबत ती हरवल्याची नोंद होती. आज गुरुवार दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना चिमुकलीचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.