विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने 11 सप्टेंबर गुरुवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास संघटनेची मागणी मंजूर करण्यासाठी तहसिल कार्यालय कूही समोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की विदर्भ महसूल संघटनेच्या वतीने त्यांच्या मागणीसाठी तहसील कार्यालय कूही समोर नारे देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अतुल ठवकर उपाध्यक्ष सचिन मोंगसे, पूजा फोकमारे तालुक्यातील आदी महसूल सेवक उपस्थित होते.