सेवा सप्ताह कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आज मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, पु.ल.देशपाडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर उपस्थित होते.