देवरी आमगाव मार्गावरील बोरगाव समोरील नवातलाव नजीक आज दिनांक 24 ऑगस्टला सकाळी नऊ वाजे सुमारास रस्त्याच्या कडेवरील एक मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी एकत्र येत तात्काळ रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक सुरळीत केली सविस्तर असे की देवरी आमगाव राज्य मार्गावरील सतत होणाऱ्या पावसामुळे जमिनीला ओलावा असल्याने रस्त्याच्या कडेला असलेले मोवईचे एक धोकादायक झाड कोसळले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही