Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
संजरपूर शिवारातील गट क्र. ४५ मध्ये तुळशीराम साळुंके कुटुंबासह वास्तव्यास असून मंगळवारी रात्री ते घराच्या समोरील पडवीमध्ये कुटुंबासह झोपी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात भामट्याने तुळशीराम साळुंके यांच्या पत्नीच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र, कानातील ३६ हजारांचे टापसे, असे १ लाख २६ हजारांचे दागिने काढून पोबारा केला.