नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत दि. 6 ऑक्टोबरला मुंबईत काढली जाणार असून नगर विकास विभागाने सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवून या सोडतीची माहिती दि. 03 ऑक्टोबर रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मार्च 2022 पासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे. आरक्षण निश्चित होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या सोडतीकडे लागले असून निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे.