गणेश विसर्जन मिरवणुकीत डी.जे. वाजवल्यास कारवाई होणार - पोलीस निरीक्षक भुसनुर अहमदपूर शहरासह तालुक्यात आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डी.जे. (DJ) वाजवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर यांनी दिला आहे. प्रशासनाने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी डीजेमुक्त विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी वाढल्या होत्या.