आपल्याला कर्मयोगी व्हायचे असल्यास सतत शिकत राहणे आवश्यक आहे. कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य आहे. शासकीय कामकाजातील नोटिंग, टिपणी, फायलिंग यांसारख्या मूलभूत बाबी प्रत्येक कर्मचाऱ्याने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आज सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सेवाविषयक बाबींच्या पुर्तता मेळाव्याचे आयोजन जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते.