आज गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देखील दिले. यावेळी तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.