जत तालुक्यातील मुचंडी–गुडापूर रस्त्यावरील दरीकोणुर हद्दीत गुरुवार दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजता एक अपघाताची घटना घडली. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची (क्रमांक KA–23 F–1073) कोसळून दरीत गेली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवासी आणि चालक-कंडक्टर यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले निपाणी गुड्डापूर ही बस पुलाचे बॅरिकेट तोडून खाली कोसळली अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.