हिंगणघाट शहरातील कारंजा चौक परिसरातील प्रभाव क्रमांक १३ येथील एकमेव सुप्रसिद्ध श्री गणेश मंदिरात मंदिर उत्सव कमिटीच्या वतीने गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या मंदिराला आमदार समिरभाऊ कुणावार यांनी भेट देऊन बापाचे दर्शन घेऊन आरती केली यावेळी श्री गणेश मंदिर कमिटीच्या वतीने आमदार समिरभाऊ कुणावार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करीत मार्गदर्शन केले.