नगर-मनमाड महामार्गावर रस्ते अपघातात मृतांच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आज सोमवारी सकाळी राहुरी तहसील कार्यालयावर मुंडन करत दशक्रिया विधी मोर्चा केला. रस्त्या कामात पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांची वर गुन्हे दाखल करून अटक करा अन्यथा सात दिवसाच्या चक्काजाम करू असा इशारा माजी मंञी प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला आहे.