राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूरला जाऊन नामदेव पायरीजवळ पांडुरंगाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी आज रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी मांसहार करणे आणि मोठ्या प्रमाणावर शत्रू जोडणे यासारख्या गोष्टींमुळे त्यांच्या कुटुंबाची राजकीय अधोगती झाली असून, हे कर्माचे फळ आहे, असे कुलकर्णी म्हणाले. संत तुकाराम महाराजांनी जे लिहिले आहे, त्याचे वाचन सुप्रिया सुळे यांनी करावे, असेही त्यांनी सुचवले.