बौद्ध धर्मगुरु भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत रविवार दि. 31 ऑगस्टला सकाळी अकरा वाजता पासून मनसर येथील मंजुश्री बुद्ध महाविहार येथून नागार्जुन बुद्ध महाविहार, नागार्जुन पर्यंत रामटेक मार्गे भव्य बाईक रॅली काढण्यात आली. आकर्षक सजवलेल्या भव्य रथावर भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे विराजमान होते. रॅली मार्गावर ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले.