आज दि 2 सप्टेंबर सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजी नगरात बैंक खाते बंद झाल्याचे सांगत ते पूर्ववत करण्याचे कारण देत एका ७० वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी ९७ हजार ७०० रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, २८ ऑगस्ट रोजी अज्ञात क्रमांकावरून त्यांना व्हिडिओ कॉल प्राप्त झाला. कॉल करणाऱ्यांकडील बाजू मात्र दिसत नव्हती. कॉलवर त्याने एसबीआय खाते बंद पडल्याचे सांगत