स्वतंत्र टेलरिंग महामंडळ स्थापनसाठी आमदार प्रकाश आबिटकर प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी ९ मार्चला दुपारी प्रतिपादन केले. टेलर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने गुणवंताचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अर्जुन आबिटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला टेलर वेल्फेअर असोसिएशचे पदाधिकारी उपस्थित होते.