राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनात मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 सप्टेंबरला यवतमाळ दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यानिमित्य यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध पंचवीस समितीचे गठन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थळी विविध तालुक्यातून लाभार्थ्यांची नेमणूक केली जाणार आहे त्यासाठी वाहतूक आराखडा तयार करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहे.