अकलूज पंचवटी येथे तनिष्का बेकरीसमोर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर मंगळवार (दि. ३० सप्टेंबर) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीचा ट्रक आणि होंडा शाईन दुचाकी यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात कुर्डूवाडी येथील रहिवासी व वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष नरेंद्र कांतीलाल साळुंखे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी संगीता नरेंद्र साळुंखे या गंभीर जखमी झाल्या आहेत. मृत्यूमुखी पडलेले नरेंद्र साळुंखे हे वारकरी संप्रदायात सक्रिय कार्यकर्ते होते.