गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. लालबागमध्ये वापरलेले एआय तंत्रज्ञान आता गिरगावमध्येही वापरले जात आहे. केवळ मनुष्यबळावर अवलंबून न राहता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सरकारचा विचार आहे.