Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: काशिमीरा येथे मनसेचे आंदोलन

Thane, Thane | Sep 12, 2025
काल मिरा रोड येथील नीलकमल हॉटेल जवळ एका शाळकरी मुलाचा अपघात झाला होता. आरएमसी डंपरने मुलाला धडक दिली होती. सदर मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यावर मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी संताप व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास संदीप राणे स्थानिक नागरिकांसोबत काशिमीरा येथे आंदोलनाला बसले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us